अटल आखाड्याची ध्वजा फडकली

By Admin | Updated: August 23, 2015 23:22 IST2015-08-23T23:21:48+5:302015-08-23T23:22:18+5:30

त्र्यंबकेश्वर : मंत्रोच्चार आणि वाद्यांच्या गजरात रंगला सोहळा; साधू-महंतांची उपस्थिती

Atal Akhada flag hoisted | अटल आखाड्याची ध्वजा फडकली

अटल आखाड्याची ध्वजा फडकली

त्र्यंबकेश्वर : हर हर महादेवच्या गजरात ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात आणि बॅँडच्या जल्लोषात येथील शंभू पंचायती अटल आखाड्याचे ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. तत्पूर्वी पहाटेपासून गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, सर्वोतभद्रमंडल पूजन, नवग्रह पूजन, हवन, पूर्णाहुती आदि विविध धार्मिक विधी पार पडले. आखाड्याचे मुख्य पुरोहित रतीश दशपुत्र यांच्या पौरोहित्याखाली ध्वजस्तंभ, ध्वज यांची विधिवत पूजा करण्यात आली. अटल आखाड्यात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ५२ हस्त लांबीचा ध्वज उभारण्यात उधाण आले. ‘धर्म की जय हो’ ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यास अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज, महंत सतीशगिरी महाराज, महंत ब्रह्मपुरी महाराज, महंत सत्यगिरी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत रमेशगिरी महाराज, महंत गंगाभारती महाराज, महंत विश्वनाथगिरी महाराज, महंत नरेंद्रगिरी महाराज, शिवनारायणपुरी महाराज यांच्यासह सर्व आखाड्यांचे साधू-महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थिताना गूळ-हरबऱ्याचा प्रसाद देण्यात आला. ध्वजारोहण सोहळ्याचे सर्व धार्मिक विधी जयंत दशपुत्र, कृपेश भट, किरण देवकुटे, नितीन लोहगावकर, हेमंत निखाडे, बाळासाहेब कावनईकर या पुरोहितांनी पार पाडले. या आखाड्यात दोन ध्वजा उभारण्याची परंपरा असून, दोन्ही ध्वजस्तंभांचे यावेळी पूजन करण्यात आले. पैकी दुसरी ध्वज पर्वध्वजा म्हणून ओळखली जात असून, ती पहिल्या शाहीस्नानाच्या मध्यरात्री उभारण्यात येणार आहे. या आखाड्याची पेशवाई २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे.

Web Title: Atal Akhada flag hoisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.