शेतमालास हमीभाव द्या
By Admin | Updated: January 6, 2017 00:58 IST2017-01-06T00:57:57+5:302017-01-06T00:58:10+5:30
चांदवड : शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतमालास हमीभाव द्या
चांदवड : शेतमालास हमीभाव देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी (दि. ५) चांदवड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले.
‘अब कि बार मोदी सरकार’, अच्छे दिन येणार म्हणत सर्वसाधारण शेतकऱ्यांना खोटी स्वप्न दाखवत लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविली. परंतु आता अडीच-तीन वर्षा नंतर सरकारच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालास कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. दुसरीकडे हक्काच्या पैश्यासाठी बँकेच्या खेट्या माराव्या लागत असल्याने शेतकरी पुरता हवालिदल झाला आहे असे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. ांग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, गणेश निंबाळकर, वडाळीभोई येथील सोपान जाधव, खडकओझरचे शांताराम पगार आदींनी मनोगत व्यक्त केलेत. राहुल कोतवाल, समाधान जामदार, संपतराव वक्ते, शांताराम घुले, आण्णासाहेब शिंदे, डॉ. सुशीलकुमार शिंदे, दिलीप गारे, साईनाथ गीडगे, ईश्वर देवरे, देवा पाटील, अशोक जाधव, निलेश ठाकरे, नंदू कोतवाल, मारूती ठोंबरे, संजय जाधव, शिवाजी कासव, सुभाष कोतवाल, रत्नदीप बच्छाव, यशोदीप घमंडी, सुदर्शन पानसरे, सुनिल कासव, भाऊसाहेब बरकले आदीसह तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)