शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्यासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:55 IST

जायखेडा : गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने येणाऱ्या चार लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा व तीन लाख रु पये किमतीची मिनी ...

ठळक मुद्देजायखेडा पोलिसांची कारवाई : तीन जणांना अटक

जायखेडा : गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने येणाऱ्या चार लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा व तीन लाख रु पये किमतीची मिनी पिकअप असा सात लाख बत्तीस हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जायखेडा पोलिसांनी जप्त केला. बागलाण तालुक्यातील आलियाबाद गावाजवळ सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या टीमने ही धडक कारवाई केली. याप्रकरणी अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना जायखेडा पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गुजरातकडून महाराष्ट्राकडे येत असलेली मिनी पिकअपची (क्र. एमएच २०/ ईजी २४१४) हरणबारी - अलियाबाद दरम्यान तपासणी केली असता, आरोपी शेख गुलाम बाबूलाल (रा. औरंगाबाद), शंकर धनराज पाचपुते (रा. मोठा नाका, बालाजीनगर, औरंगाबाद), जितेंद्र अशोक परदेशी (रा. कुंडलीनगर, औरंगाबाद) हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची गुजरातहून महाराष्ट्रात अवैधरीत्या वाहतूक करताना आढळून आले.याप्रकरणी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, हवालदार सोनवणे करीत आहेत.गुटखा, तंबाखू केली जप्तवाहतुकीसाठी वापरलेली मिनी पिकअप (किमत सुमारे तीन लाख रु पये) तसेच हिरा पान मसाला दोन लाख अठ्ठ्यांशी हजार रु पये किमतीच्या गुटख्याची शंभर पाकिटे व रॉयल नावाच्या तंबाखूची एक लाख चौरेचाळीस हजार रुपये किमतीची शंभर पाकिटे असा एकूण सात लाख बत्तीस हजार रु पये किमतीचा मुद्देमाल जायखेडा पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी