शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

सहायक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

By admin | Updated: December 31, 2016 23:21 IST

मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अधीक्षकाविरोधात विद्यार्थिनींचा एल्गार

कळवण : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत मानूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ९० विद्यार्थिनींनी दमबाजी करणाऱ्या महिला अधीक्षकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून निवेदन दिले.  प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांनी दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुलींनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. वसतिगृहात पथक पाठवून चौकशी करण्यात आली असून, संबंधित महिला अधीक्षकास नोटीस देण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या अधीक्षकाविरोधातील विद्यार्थ्यांच्या  तक्रारीची सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी दखल घेतल्यानंतर शनिवारी कळवण शहराजवळील मानूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील ९० मुलींनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या मांडून महिला अधीक्षकाविरोधात एल्गार पुकारल्याने आदिवासी प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली आहे. शासनाने कोट्यवधी रु पये खर्च करून मानूर येथे सर्व सुखसुविधायुक्त मुलींचे वसतिगृह बांधले आहे. या वसतिगृहात अधीक्षक राहात नाही. अधीक्षकांचे दुर्लक्ष असल्याने वसतिगृहातील मुली नेहमी आजारी पडतात. मुलींच्या आरोग्याची अधीक्षकांकडून काळजी घेतली जात नसून मुलींच्या आरोग्य व आजाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आजारी मुलींकडून आजारी का पडल्या, याचे लेखी लिहून मागितले जाते. अधीक्षक निर्वाह भत्ता वेळेवर व पूर्ण देत नाही. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी वसतिगृहाला भेट देण्यास आले तर तक्र ारी करू नका, असा दम अधीक्षक देतात. वसतिगृहातील मुलींना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्र ार या मुलींनी केली आहे. (वार्ताहर)