सेवानिवृत्त शिक्षक, पोलिसांकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:18 IST2020-04-08T23:17:43+5:302020-04-08T23:18:08+5:30
रोजंदारीवर मजुरी करण्यासाठी आलेली माणसे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या घरापासून पुढील काही दिवस दुरावली आहेत. या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक आणि पोलीस धावून आले आहेत.

मजूर कुटुंबीयांना गव्हाची पोती सुपूर्द करताना प्रमोद वाघ, कारभारी पगार, मधुकर तारू, हिंमत चव्हाण, कैलास घरटे, दीपक पगार आदी.
कळवण : रोजंदारीवर मजुरी करण्यासाठी आलेली माणसे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या घरापासून पुढील काही दिवस दुरावली आहेत. या कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक आणि पोलीस धावून आले आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व कळवणचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक कारभारी पगार यांनी या कुटुंबीयांना गव्हाची पोती व भाजीपाला घेऊन देत उदरभरणाचा प्रश्न सोडविला आहे. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते कारभारी पगार, पोलीस कर्मचारी मधुकर तारू, कैलास घरटे, हिंमत चव्हाण, पोलिस मित्र दीपक पगार, भास्कर चव्हाण उपस्थित होते.