मतदार ओळखपत्रांचे उमराणे येथे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 19:00 IST2019-03-18T18:59:38+5:302019-03-18T19:00:14+5:30
उमराणे : मतदार जनजागृती मोहीमेतंर्गत नविन नाव नोंदणी केलेल्या मतदारांना झोनल अधिकारी तसेच देवळा तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

मतदार ओळखपत्रांचे उमराणे येथे वाटप
उमराणे : मतदार जनजागृती मोहीमेतंर्गत नविन नाव नोंदणी केलेल्या मतदारांना झोनल अधिकारी तसेच देवळा तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
मतदानापासुन कोणीही वंचित राहु नये, वंचीत व नविन मतदारांचे मतदान यादीत नाव नोंदणी करण्यात यावे यासाठी शासनाच्या मतदार जनजागृती मोहीमेंतर्गत गेल्या काही दिवसांपुर्वी नाव नोंदणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नाव नोंदणी केलेल्या मतदारांना निवडणुक आयोगाकडुन मतदार ओळखपत्र उपलब्ध झाले असुन त्यांचे वितरण येथील ग्रामपंचायत कार्यालयात संजय गिते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसुल विभागाचे मंडल अधिकारी व्ही. जी. पाटील, तलाठी एस. एस. पवार, सरपंच लता देवरे, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, ग्रामविकास अधिकारी जे. ए. झाल्टे, भरत देवरे, दिपक देवरे, भगवान देवरे, अविनाश देवरे, आदिंसह बहुतांश नागरिक व मतदार उपस्थित होते.