फुलेनगरला महिलेवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST2021-05-12T04:15:27+5:302021-05-12T04:15:27+5:30

--- पंचवटी : जुन्या भांडणाची कुरापत काढून फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना राजू शेख या महिलेवर धारदार कोयत्याने वार करून ...

Assault on a woman in Phulenagar | फुलेनगरला महिलेवर प्राणघातक हल्ला

फुलेनगरला महिलेवर प्राणघातक हल्ला

---

पंचवटी : जुन्या भांडणाची कुरापत काढून फुलेनगर येथे राहणाऱ्या हिना राजू शेख या महिलेवर धारदार कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित हल्लेखोर हेमंत बाबुराव गांगुर्डे यास अटक केली आहे.

याबाबत हिना शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास संशयित गांगुर्डे हा शेख यांच्या घराजवळ आला. त्यावेळी शेख यांनी ‘तू तमाशा का करतो’ असे म्हटल्याचा राग आल्याने गांगुर्डे याने शिवीगाळ करीत हातातील धारदार कोयत्याने हातावर वार करून जखमी केले. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित गांगुर्डे याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या. रात्री उशिरा घडलेल्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Web Title: Assault on a woman in Phulenagar