वडाळा रोड परिसरात एकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:13 IST2021-05-17T04:13:12+5:302021-05-17T04:13:12+5:30

नाशिक : न्यायालयात दावा दाखल केल्याच्या रागातून वडाळा रोड परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करत खुनाचा प्रयत्न ...

Assault on one in Wadala Road area | वडाळा रोड परिसरात एकावर प्राणघातक हल्ला

वडाळा रोड परिसरात एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : न्यायालयात दावा दाखल केल्याच्या रागातून वडाळा रोड परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करत खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज अब्दुल गफार मेमन यांनी मियॉ खतीब उर्फ शहरार व रौफ खतिब यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. त्याचा राग मनात धरून रियाज अब्दुल गफार मेमन (५२, रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, वडाळा रोड) हे दुचाकीवरून घरी जात असताना, संशयित वसीम नासिर खतिब, मुजफर रफिक खतीब, रजा खतीब, पप्पू काकणी, अतिक खतिब, सेकंड खतिब यांच्यासह तीन ते चारजणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. रियाज मेमन यांना डोक्यावर व पायावर लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault on one in Wadala Road area