आर्थिक व्यवहारातून एकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST2021-03-06T04:14:21+5:302021-03-06T04:14:21+5:30

मुमताज साकीर अन्सारी उर्फ गुड्डू प्लंबर (रा. मशिदीमागे,बजरंगवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रिझवान अन्वर अहमद (रा. ...

Assault on one of the financial transactions | आर्थिक व्यवहारातून एकावर प्राणघातक हल्ला

आर्थिक व्यवहारातून एकावर प्राणघातक हल्ला

मुमताज साकीर अन्सारी उर्फ गुड्डू प्लंबर (रा. मशिदीमागे,बजरंगवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी रिझवान अन्वर अहमद (रा. नानावली) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अहमद कुटुंबीयांनी अन्सारी याच्याकडून चार हजार रुपये हात उसनवार घेतले होते. याची परतफेड रिझवानचा भाऊ इस्तियाक अहमद याने केली होती. रिझवान बुधवारी (दि.३) परिसरातून जात असताना त्यास अन्सारी भेटला. त्याने पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्याने रात्री दोघे भाऊ अन्सारीच्या घरी गेले असता ही घटना घडली. परतफेड केलेली असतानाही संशयिताने नाकबूल जात मला पैसे द्या नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संतप्त अन्सारी याने इस्तियाक यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फावड्याचा लाकडी दांडा इस्तियाकच्या डोक्यात मारला. यात इस्तियाक गंभीर जखमी झाला. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assault on one of the financial transactions