पंचवटी : आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर एका रिक्षा चालकावर मंगळवारी सायंकाळी अज्ञात आरोपींनी लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात दिंडोरी रोडवरील मायको दवाखाना जवळ राहणारा रिक्षाचालक सचिन कचरू नेटावटे (३४) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे पोलिसांनी सांगितले. नेटावटे हा गंभीर जखमी झाल्याने तो बेशुद्धावस्थेत असून त्याला कोणी व का मारले याचे कारण समजू शकले नाही. नेटावटे याच्या गळ्याखाली, जबड्यावर, डोळ्याजवळ तसेच डोक्यावर जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 01:16 IST