पूर्ववैमनस्यातून युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:15 IST2021-03-10T04:15:45+5:302021-03-10T04:15:45+5:30

या मारहाण प्रकरणी दिंडोरी रोडवरील वडनगर येथे राहणाऱ्या सचिन बबन राक्षे याने तक्रार दाखल केली आहे, तर चौघांनी केलेल्या ...

Assassination of a youth out of prejudice | पूर्ववैमनस्यातून युवकावर प्राणघातक हल्ला

पूर्ववैमनस्यातून युवकावर प्राणघातक हल्ला

या मारहाण प्रकरणी दिंडोरी रोडवरील वडनगर येथे राहणाऱ्या सचिन बबन राक्षे याने तक्रार दाखल केली आहे, तर चौघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात समीर राक्षे हा गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले म्हसरुळ पोलिसांनी सोमनाथ शिवाजी गवारे, संतोष शिवाजी गवारे, सूरज उर्फ सुनील दत्तू गवारे या तिघांना अटक केली आहे, तर सागर दत्तू गवारे हा फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी घटनेतील फिर्यादी व संशयित आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाच्या कारणातून रविवारी रात्रीच्या वेळी पुन्हा वाद निर्माण झाले, त्यावेळी संशयितांनी समीर राक्षे यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून डोक्यात फरशीचा तुकडा मारून धारदार शस्त्राने डोक्यावर पाठीवर वार करून गंभीर जखमी केले, तसेच तुला आज खतम करतो, असा दम दिला. या मारहाणीनंतर पसार झालेल्या संशयितांना म्हसरूळ पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: Assassination of a youth out of prejudice