महालक्ष्मीनगरच्या रस्त्यांचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST2021-05-22T04:14:22+5:302021-05-22T04:14:22+5:30

महालक्ष्मीनगर, केला कॉलनी, कर्पेनगर, संजीवनीनगर देवी मंदिररोड या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. या भागातील रस्त्यांचा प्रथमच विकास करण्यात आला. ...

Asphalting of Mahalaxminagar roads | महालक्ष्मीनगरच्या रस्त्यांचे डांबरीकरण

महालक्ष्मीनगरच्या रस्त्यांचे डांबरीकरण

महालक्ष्मीनगर, केला कॉलनी, कर्पेनगर, संजीवनीनगर देवी मंदिररोड या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. या भागातील रस्त्यांचा प्रथमच विकास करण्यात आला. उपनगरात बंदिस्त गटारीसह रस्ते डांबरीकरण व्हावेत ही अनेक दिवसांपासून मागणी होती.

बंदिस्त गटारीसह डांबरीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. उपनगरांतील उर्मिला चौधरी, सुनीता वारुंगसे, अनिता गोरे, संगीता ढोलीत, सुजाता शिंदे, स्मिता गवाने, अर्चना अढांगळे, दीपाली चव्हाणके, नीता येलमामे, वैष्णवी पाठक, आरती गोडसे, जयश्री जाधव, मंजूषा थोरात आदींसह महिलांनी विकासकामांचे स्वागत केले.

अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत बंदिस्त गटार, खडीकरण, डांबरीकरण कामे झाली आहेत. माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे यांनी निधी उपलब्ध करून दिला.

Web Title: Asphalting of Mahalaxminagar roads