रेल्वे प्रकल्प रद्दबाबत महसूलमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:57 IST2020-08-18T22:20:28+5:302020-08-19T00:57:52+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देताना बाळासाहेब कुकडे, रामदास धांडे, कमलाकर नाठे, हिरामण खोसकर आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांमधून ही रेल्वे लाइन जात आहे तेथील शेतकºयांच्या या आधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच इतर जमिनी औद्योगिक वसाहत, धरणे, महामार्ग यासाठी संपादित केल्या आहे. यामुळे आता या रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
येथील शेतकºयांनी या रेल्वे प्रकल्पाला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेक शेतकºयांचा उदरनिर्वाह चालत आहे. शासन जर हाती असलेली ही जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असेल तर आम्हाला भूमिहीन झाल्याशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे व तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्यात यावा, असे साकडे घातले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळ, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, जनार्दन माळी, कचरू पाटील शिंदे, बाळासाहेब कुकडे, अरुण गायकर, निवृत्ती कातोरे, कमलाकर नाठे, ज्ञानेश्वर पागेरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.