अश्विनी बोरस्ते यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

By Admin | Updated: July 17, 2014 00:32 IST2014-07-16T22:37:25+5:302014-07-17T00:32:43+5:30

अश्विनी बोरस्ते यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

Ashwini Boraste resigns as city president | अश्विनी बोरस्ते यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

अश्विनी बोरस्ते यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेल्या नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांनी हा ‘भार’ सहन न झाल्याने पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.
आठवडाभरापूर्वीच त्यांनी लेखी स्वरूपात पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला असून, बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच आपली बदनामी पक्षातीलच काही जण करीत असल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहर कॉँग्रेसमध्ये पक्षशिस्तीचा प्रचंड अभाव असून, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याचा पक्ष संघटनेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


अश्विनी बोरस्ते यांनी सांगितले की, आपण याआधीही लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा देण्याबाबत चर्चा केली होती; मात्र पक्षश्रेष्ठींनी आपल्याला पक्ष संघटन वाढविण्यास सांगितले होते. लोकसभा निवडणुकीतही काही किरकोळ कारणावरून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न काहींनी केला. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबीयांवर व सामाजिक कार्यावर झाला. आता तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा मानसिक त्रास सहन होत नसल्याने कुटुंबीयांनीच आपल्याला पद नको अशी भूमिका घेतल्याने आपण शहराध्यक्ष म्हणून कार्यभार करू शकत नाही, असे पक्षश्रेष्ठींना कळवून लेखी स्वरूपात राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण सहा महिन्यांपूर्वी शहरातील गट-तट एकत्र आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यास यश आले नाही. काही प्रामाणिक कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाशी एकनिष्ठ आहेत; मात्र काही जण आपण सूत्रे स्वीकारल्यापासूनच आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत होते. आपण बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिला पक्षाशी जोडल्या; मात्र पक्ष संघटनेत शिस्तीचा अभाव आहे. आपण पुढील जबाबदारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सांभाळण्यास तयार नसल्याचे कळवून राजीनामा दिला आहे. (प्रतिनिधी)
इन्फो..
प्रभारींकडे कुरबुरी
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेसने प्रभारी निरीक्षक म्हणून दिनेश परमार यांना नाशिकच्या दोनदिवसीय दौऱ्यावर पाठविले आहे. बुधवारी परमार यांनी शहर कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी युवक कॉँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांच्या कारभाराविषयी तक्रारी केल्याचे कळते. याची माहिती शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांना कळताच त्यांनी आठवडाभरापूर्वीच दिलेल्या राजीनाम्याची पत्रकार परिषद घेऊनच माहिती दिली. त्यामुळे शहर कॉँग्रेसमध्ये अद्यापही गट-तटाचे राजकारण प्रखरपणे सुरू असल्याची चर्चा आहे. नवीन शहराध्यक्षपदासाठी पुन्हा अ‍ॅड. आकाश छाजेड यांच्या नावाची चर्चा आहे.

Web Title: Ashwini Boraste resigns as city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.