पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोध

By Admin | Updated: July 31, 2014 00:49 IST2014-07-30T22:21:07+5:302014-07-31T00:49:06+5:30

पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोध

Ashok Regade as Padwal's Sarpanch unanimously elected | पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोध

पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोध

पाडळीच्या सरपंचपदी अशोक रेवगडे बिनविरोधठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अशोक वामन रेवगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच चंद्रभान रेवगडे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीसाठी मंडळ अधिकारी आर.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपदासाठी अशोक रेवगडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा पाटील यांनी केली. सरपंचपदाच्या रेवगडे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सुभाष रेवगडे यांनी स्वाक्षरी केली
होती.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव, किरण शिंदे, मंगल संजय रेवगडे, जीजाबाई किसन बोगीर, संदेश रामनाथ शिंदे, गणपत दामोधर रेवगडे, ग्रामसेवक डी.एस. भोसले उपस्थित होते. अशोक रेवगडे यांची सरपंचपदी निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी समर्थक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ashok Regade as Padwal's Sarpanch unanimously elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.