एकलहरेच्या सरपंचपदी अशोक पवळे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:14+5:302021-02-05T05:40:14+5:30
एकलहरे ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी मोहिनी जाधव या थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. मात्र ...

एकलहरेच्या सरपंचपदी अशोक पवळे यांची निवड
एकलहरे ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी मोहिनी जाधव या थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. मात्र गेल्या आठवड्यात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणास्तव त्यांंचे सरपंच व सदस्यपद रद्द ठरविण्यात आले. त्यामुळे शनिवारी एकलहरे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदाची निवड करण्यात आली. उपसरपंच अशोक पवळे याची सरपंचपदासाठी निवड करण्यात आली. यावेळी वैशाली धनवटे, विशवनाथ होलीन, संजय ताजनपुरे, नीलेश धनवटे, निर्मला इंगळे, रुपाली कोकाटे, कांताबाई पगारे, जयदेव वायदंडे, श्रीराम नागरे, सुरेखा जाधव, मुक्तता दुशिंग, रत्नाबाई सोनवणे, शोभा वैद्य, निर्मला जावळे, सुरेश निंबाळकर आदी उपस्थित होते. सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात विविध प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच अशोक पवळे यांचा नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्यासह विविध संस्था, संघटना व गावकऱ्यांंतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ पवळे, राहुल बेरड, सचिन चौधरी, सचिन जगताप, प्रशांत सोनवणे, राहुल दाते, ज्ञानेश्वर पवळे, सुनील पवळे, संभाजी पवळे, तानाजी राजोळे, भाऊसाहेब राजोळे, सुरज निंबाळकर, गणेश जामादार, हरीश गांजवे, अरुण दुशिंग, अमोल हिंगोले आदी उपस्थित होते. (फोटो ०१ एकलहरे)