Ashok Kharat Case : नाशिकमधीलअशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या केबीनमधील आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत, खरात याने महिलांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे व्हिडीओ खरात याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव याने बाहेर काढले आहेत. आता पोलिसांनी या नीरज जाधव याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी नीरज जाधव याला संरक्षणही दिले आहे.
नीरज जाधव याच्याकडून पोलिसांना मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. अशोक खरात याचे कोणासोबत जवळचे संबंध होते? त्याला कोण मदत करत होते? याबाबत सर्व माहिती समोर येणार आहेत. तसेच राजकीय वर्तुळातील कोणत्या नेत्याचा खरात याला पाठिंबा आहे, आणखी काही नवीन माहिती मिळवण्याचा पोलिस प्रयत्न करणार आहेत.
अशोक खरातचा पीए नीरज जाधव याला पोलिस आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी नीरज जाधवला क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले होते. कॅप्टन खरातचे सगळे CCTV नीरज जाधव याच्याकडे आहेत. खरातचे सर्व काळे कारनामे, त्याने केलेले आर्थिक व्यवहार, त्यासाठी त्याने वापरलेले राजकीय बळ, केलेली दमदाटी याची सर्व माहिती नीरज जाधव याला आहे. यामुळे आता जाधव याची माहिती या तपासात महत्वाची ठरणार आहे.
अशोक खरात याचे राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे जवळचे संबंध होते. याबाबत आज खासदार संजय राऊत यांनीही मोठा दावा केला आहे. राऊत यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांचा खरातशी थेट संबंध होता असा दावा केला आहे. ते मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी त्याच्याकडे जात होते. तर यातील काहींची त्याच्याशी व्यवसायिक भागीदारी होती असा आरोपही होत आहे.
अशोक खरातचे राजकीय आणि VIP लागेबांधे याची नीरज जाधवला सगळी माहिती होती. मंत्री, आमदार, खासदार राज्यातील बडे नेते यांच्याशी खरातचे काय संबंध होते, आर्थिंक व्यवहार होते का? याबाबतची सगळी माहिती नीरज जाधव याच्याकडून पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.
Web Summary : The Ashok Kharat case involves sexual assault allegations. His PA, Neeraj Jadhav, possessing crucial CCTV footage and financial details, is now in police custody. Investigations are focused on Kharat's political connections, with claims of links to ministers. Jadhav's information is vital for the ongoing inquiry.
Web Summary : अशोक खरात मामले में यौन उत्पीड़न के आरोप हैं। उनके पीए, नीरज जाधव, के पास महत्वपूर्ण सीसीटीवी फुटेज और वित्तीय विवरण हैं, और अब वह पुलिस हिरासत में हैं। जांच खरात के राजनीतिक संबंधों पर केंद्रित है, मंत्रियों के साथ संबंधों के दावे हैं। जाधव की जानकारी चल रही जांच के लिए महत्वपूर्ण है।