लासलगाव मर्चंट्स बँक चेअरमनपदी अशोक गवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 17:59 IST2020-12-21T17:58:37+5:302020-12-21T17:59:16+5:30
लासलगाव : येथील लासलगाव मर्चंट्स ऑप बँकेच्या चेअरमनपदी अशोक गवळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लासलगाव मर्चंट्स बँक चेअरमनपदी अशोक गवळी
लासलगाव : येथील लासलगाव मर्चंट्स ऑप बँकेच्या चेअरमनपदी अशोक गवळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र घोलप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सोमवारी (दि.२१) निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत निवडीची सभा पार पडली. तत्कालीन चेअरमन संजय कासट व व्हाईस चेअरमन सोमनाथ शिरसाठ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित चेअरमनपदासाठी अशोक गवळी यांचे नाव संचालक अजय ब्रम्हेचा यांनी सुचविले त्यास संजय कासट यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदासाठी राजेंद्र घोलप यांच्या नावाची सूचना संतोष पलोड यांनी मांडली त्यास सोमनाथ शिरसाठ यांनी अनुमोदन दिले.
या निवडीनंतर नवनियुक्त चेअरमन अशोक गवळी यांनी बँकेचा आलेख वाढतच चालला असून बँकेचे नावलौकिक कायम राहण्यासाठी सर्व संचालक मंडळाने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. संचालक मंडळाच्या वतीने व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मावळते चेअरमन संजय कासट, अजय ब्रम्हेचा, संतोष पलोड, डि. के.जगताप, पारसमल ब्रम्हेचा, ओमप्रकाश राका, सचिन मालपाणी, किसन दराडे, सोमनाथ शिरसाठ, हर्षद पानगव्हाणे, सचिन शिंदे, प्रवीण कदम, संगीता पाटील, अर्चना पानगव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम रसाळ आदी उपस्थित होते.