पेठ येथे आशा वर्कर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 18:47 IST2020-02-15T18:46:07+5:302020-02-15T18:47:04+5:30
सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावस्तरावर कामकाज करणाऱ्या आशा वर्कर यांच्या सबलीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली.

पेठ येथे आशा कर्मचारी यांचा सन्मान करताना अमित भुसावरे, पुष्पा पवार, तुळशीराम वाघमारे, डॉ. मोतीलाल पाटील, मोहन कामडी, सुरेश पवार, मनोहर तुंबडे आदी.
पेठ : सार्वजनिक आरोग्य विभाग व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावस्तरावर कामकाज करणाऱ्या आशा वर्कर यांच्या सबलीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळा झाली.
आदिवासी भागातील माता व बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी आशा कर्मचारी प्रयत्न करीत असतात. आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्यासंदर्भात जाणीव जागृती व आरोग्य सेवेचे उत्तम काम करणाºया आशा कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने चित्रकला, निबंध, गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती पुष्पा पवार, तुळशीराम वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, मोहन कामडी, सुरेश पवार, बाळासाहेब चौधरी, तालुका संघटक मनोहर तुंबडे यांच्यासह आशा कर्मचारी व गटप्रर्वतक उपस्थित होते.