वाघळे सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ

By Admin | Updated: August 29, 2016 00:19 IST2016-08-29T00:17:02+5:302016-08-29T00:19:47+5:30

वाघळे सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ

Arun Wagh, Chairman of Wagle Society | वाघळे सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ

वाघळे सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ

 द्याने : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ यांची, तर उपसभापतिपदी गणपत खरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा सोसायटी कार्यालयात घेण्यात आली.
सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत सभापतिपदासाठी वाघ व उपसभापतिपदासाठी खरोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. अहिरे व चंद्रकांत अहिरे यांनी काम पाहिले.
यावेळी सदस्य रावसाहेब भामरे, नारायण वाघ, बाजीराव वाघ, नामदेव देवरे, नंदलाल वाघ, आप्पा वाघ, रूपचंद दाभाडे, दगा जाधव, महिला प्रतिनिधी बिबाबाई वाघ, रचना भामरे उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी उखा भामरे, पंडित वाघ, शेखर काकडे, कारभारी भामरे, सुभाष वाघ, दादा भामरे यांच्यासह संस्थेचे माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन उखा भामरे यांनी केले. आभार राजेंद्र देवरे व शिवाजी चव्हाण यांनी मानले. संस्थेचे सचिव जगताप यांनी नियोजन केले होते. (वार्ताहर).

Web Title: Arun Wagh, Chairman of Wagle Society