उत्तम अभिनयासाठी भूमिकांचा अभ्यास आवश्यक अरुण कुकडे : लोकहितवादी मंडळात मार्गदर्शन

By Admin | Updated: May 26, 2014 19:20 IST2014-05-26T19:12:11+5:302014-05-26T19:20:52+5:30

नाशिक : प्रत्येक नाटकातील भूमिका वेगवेगळ्या असतात. या भूमिकांचा चांगला अभ्यास केला तर उत्तम अभिनय करता येतो, असे मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण कुकडे यांनी लोकहितवादी मंडळाच्या वतीने आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केले.

Arun Kukad needed to study the role for best acting: guidance in Lokhitvadi Mandal | उत्तम अभिनयासाठी भूमिकांचा अभ्यास आवश्यक अरुण कुकडे : लोकहितवादी मंडळात मार्गदर्शन

उत्तम अभिनयासाठी भूमिकांचा अभ्यास आवश्यक अरुण कुकडे : लोकहितवादी मंडळात मार्गदर्शन

नाशिक : प्रत्येक नाटकातील भूमिका वेगवेगळ्या असतात. या भूमिकांचा चांगला अभ्यास केला तर उत्तम अभिनय करता येतो, असे मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण कुकडे यांनी लोकहितवादी मंडळाच्या वतीने आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात बोलताना व्यक्त केले.
शिबिरातील उदयोन्मुख रंगकर्मींशी कुकडे यांनी संवाद साधला. यावेळी कुकडे यांनी सांगितले, एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेशी समरस होण्यासाठी एकाग्रभाव अत्यावश्यक आहे. नाट्य शिबिरांतून अनेक गोष्टी शिकायला मिळत असल्यातरी त्यांचा सातत्याने रियाज होणे गरजेचे आहे. यावेळी कुकडे यांनी नेपथ्य, प्रकाश, संगीत, नाट्यनिर्मिती, दिग्दर्शकाची भूमिका, संवाद लेखन याबाबतही मार्गदर्शन केले. चर्चेत पूजा वेदविख्यात, चारुदत्त दीक्षित, गीतांजली घोरपडे, पूजा चांदवडकर, उल्हास कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी कुकडे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्या हस्ते कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे कार्यवाह सुनील ढगे यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे सचिव नवीन तांबट यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष पाटील यांनी आभार मानले. यावेळी रंगकर्मी उपस्थित होते.

Web Title: Arun Kukad needed to study the role for best acting: guidance in Lokhitvadi Mandal