आठ देशांतील कलाकारांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 23:07 IST2016-01-30T23:05:38+5:302016-01-30T23:07:10+5:30
आठ देशांतील कलाकारांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

आठ देशांतील कलाकारांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
कळवण : युक्रेन, रशिया, इंग्लंड, चीन, इटली, स्पेन, कॅनडा व बेल्जियम या आठ देशांतील २२ कलाकारांनी विविध भजने, नृत्यातून ही भारतीय संस्कृतीची महान परंपरा उभी केली तेव्हा उपस्थितांच्या नेत्रांची पारणे फेडली. कळवण येथील साई लॉन्समध्ये आयोजित निर्मलादेवी सहजयोग राष्ट्रीय ट्रस्टतर्फे या आंतरराष्ट्रीय युवाशक्तीच्या भारत दौऱ्याचे आयोजन केले असून, त्या अंतर्गत हा आगळावेगळा नृत्याविष्कार पार पडला. सहजयोग कार्यक्रम निमित्ताने परदेशी पाहुण्यांनी कळवणकरांना थक्क केले. तबला, गिटार, मृदंग, टाळ या वाद्यांच्या संगतीने परदेशी युवतींनी सादर केलेले कथ्थक व कुच्चीपुडी नृत्य... बम बम भोले, श्री गणेशा गणेशा, जय जय महाराष्ट्र माझा, महालक्ष्मी स्तोत्र आदिंसह नृत्याविष्कार, अगदी तालासुरात मुग्ध करणारी भजने सादर करीत परदेशी युवा कलाकारांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आपल्याला नव्हे तर जगाला प्रिय आहे, याचे या रंगारंग कार्यक्रमा-निमित्त पुन्हा एकवार दर्शन घडले.
महाराष्ट्राची मराठमोळी ओळख असलेले फेटे या परदेशी युवकांना श्रीकांत खंदारे या येथील कलाकाराने बांधले होते. त्यामुळे हा कार्यक्र म अधिकच संस्कृतीचे दर्शन घडवणारा झाला.