शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आर्टीलरी सेंटर : ५५०नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 15:31 IST

नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते.

ठळक मुद्देलष्करी थाटात पार पडला दीक्षांत सोहळायंदाही पालक सोहळ्याला मुकले

नाशिक : भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या तोफखाना केंद्रातून ४२ आठवड्यांचे खडतर शास्त्रशुध्द प्रशिक्षण पुर्ण करत ५५० नवसैनिकांनी विविवध तोफांच्या साक्षीने बुधवारी (दि.२९) देशसेवेची शपथ घेतली. प्रशिक्षणार्थी नवसैनिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राच्या उमराव मैदानावर पार पडला. नवसैनिकांच्या तुकडीने केलेल्या संचलनाने लक्ष वेधून घेतले.भारतीय सेनेचे नाशिकरोड येथे सर्वात जुने आणि मोठे असे भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून दरवर्षी निवड प्रक्रियेतून आलेल्या सुमारे साडेपाच हजार तरुणांना नवसैनिक म्हणून घडविले जाते. वरुणराजाच्या साक्षीने येथील उमराव मैदानावर लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या विशिष्ट अशा लष्करी धूनच्या चालीवर नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते. या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी खुल्या जिप्सी वाहनातून मैदानावरील संचलनाची पाहणी केली. दरम्यान, यावेळी प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या काही नवसैनिकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलू कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट नवसैनिक म्हणून कृष्णा कुमार यादव या जवानाला सन्मानित केले गेले.४२आठवडे आपल्या मुलाला आपल्यापासून लांब ठेवल्यानंतर सैनिकाच्या वर्दीमध्ये त्याची रुबाबदार छबी दीक्षांत सोहळ्यात अनुभवण्यासाठी आतुर असलेल्या माता-पित्यांसह पालकांना यावेळी उपस्थित राहता आले नाही. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागNashikनाशिकSoldierसैनिक