भालूरला कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा
By Admin | Updated: May 30, 2014 01:31 IST2014-05-30T01:25:01+5:302014-05-30T01:31:20+5:30
!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्या बंधार्याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे.

भालूरला कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा
!मनमाड : भालूर गावाला पाणीपुरवठा करणार्या बंधार्याखालील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असले तरी ते पाणी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचतच नसल्याने भालूरकरांना तीव्र पाणी-टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही पाइपलाइन फोडून काही धनदांडग्या शेतकर्यांनी शेतीसाठी पाणी घेतल्याने मात्र पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आल्याची तक्रार करण्यात येत आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधान-कारक पावसामुळे भालूर गावाच्या पश्चिम शिवारात असलेल्या बंधार्यास व त्या खाली असलेल्या गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीला यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही केवळ नियोजनाअभावी भालूरकरांवर आज पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गावातील पाण्याची टाकी व पाणीपुरवठा विहीर ही तीन कि.मी. अंतराची पाइपलाइन असून, याही पाइपलाइन फोडून काही शेतकर्यांनी शेतीसाठी पाणी घेतले असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असतानाही गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचू शकत नसल्याने टाकी पूर्ण भरली जात नाही. परिणामी अनेक भागांत नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योग्य नियोजनाअभावी पाच-सहा दिवसांनंतर येणारे पाणीही गावाच्या ठरावीक भागातील नळांना येत असले तरी काही भागांत मात्र पाणीच येत नसल्याने पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. महागडी पाणीपट्टी भरणार्यांना पाण्यासाठी स्टॅँडपोस्टवर पाण्यासाठी तासनतास उभे रहावे लागत असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)