शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुकावासीयांवर कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:23 IST

वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेकडो कृषिपंप बंद : दीड महिन्यात जळाले ७० रोहित्र

नितीन बोरसे ।सटाणा : वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यातच विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे मका, भुईमूग, बाजरी आदी पिकांचा वेळेवर पेरा झाला आहे. बहुतांश पिकांची कोळपणी-देखील झाली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता असताना विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतशिवारात राहणाºया शेतकऱ्यांना तसेच जनावरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या वर्षी बागलाणमधील शेतकºयांना दुष्काळाने आर्थिक अडचणीत आणले होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे रब्बी हातात आला खरा; परंतु लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने कांदा, मका, भाजीपाला विकण्याची वेळ आली. या वारंवार येणाºया संकटामुळे शेतकरी बेजार होऊन कर्जबाजारी झाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.डोक्यावर कर्जाचा बोजा असताना बहुतांश शेतकºयांनी खरिपासाठी खासगी कर्जे घेतली आणि खरिपाचा पेरा केला आहे. मात्र अंकुर फुटत असताना वीज महावितरण कंपनीने ‘शॉक ’दिला. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने दोन महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात तर आलाच; परंतु कृत्रिम पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.जळालेले रोहित्र चोवीस तासाच्या आत बदलून देणे बंधनकारक आहे; मात्र कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नाही. बिले तर भरमसाठ दिले जातात. आगामी काळात कृषिपंप चोवीस तासात बदलून मिळण्यासाठी आपण शासन स्तरावर आवाज उठविणार आहोत.- दिलीप बोरसे, आमदारलॉकडाऊनमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच रोहित्र दुरु स्तीअभावी पडून आहेत. काही दिवसांपूर्वी आॅइलचा तुटवडा होता. आता मजूर काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सात ते आठ दिवसात सर्वच रोहित्र बदलून देण्यात येतील.- सुनील बोंडे,कार्यकारी अभियंता, सटाणा विभाग

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी