शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

आर्टिफिशीयल इंटेलिजन्स हीच भविष्यातील संधी, महेश संघवी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 23:32 IST

नाशिक - आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ या तंत्रज्ञानाकडे आधुनिक विश्व आकर्षित होऊ लागले आहे. जगात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली ...

ठळक मुद्देयंत्राच्या कामातील अचूकता वाढेल चालक विरहीत कार याच तंत्रज्ञानाच्या आधारावर

नाशिक-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ या तंत्रज्ञानाकडे आधुनिक विश्व आकर्षित होऊ लागले आहे. जगात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली चालकविरहित कार हे त्या तंत्रज्ञानाचाच आविष्कार असून, भविष्यातील बहुतांश तंत्रज्ञान हे ‘एआय’वरच अवलंबून राहणार आहे. त्यामुळेच तरुणाईचा कलदेखील या शाखेकडे झुकू लागल्याचे चित्र सध्या दिसू लागले असल्याचे मत चांदवडच्या जैन कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख महेश संघवी यांनी व्यक्त केले. अभियांत्रिकी क्षेत्रातील सध्या आर्टिफिशीयल इंटेलिजन्स चर्चेत आहे. त्याबाबत त्यांनी माहिती दिली.प्रश्न: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय? आणि रोबोटिक्स व आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये काय फरक आहे?संघवी-आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला ढोबळ मनाने मशीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता टाकणे, असे म्हणता येईल. असे मशीन जे निर्धारित काम विचारपूर्वक करते. अशा प्रकारची मशीन्स ही मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्य करतात. रोबोटला आपण एखादे विशिष्ट काम आखून दिले, पण त्याच्या वाटेत काही अडथळा निर्माण केला तर रोबोट ते कार्य करताना अडथळ्याला अडकून पडेल. पुन्हा कितीही वेळा पाठवले तर पुन्हा-पुन्हा पडेल, हे झाले रोबोटिक्स. तर ‘एआय’ आधारित रोबोट हा एकदा त्या अडथळ्याला अडकेल, पण दुसऱ्यांदा त्यातून शिकून तो अडथळा टाळून मार्गक्रमण करीत कार्य करेल. हा रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा फरक आहे. जगात सध्या बोलबाला होत असलेल्या ‘चालकविरहित कार’ या एआय तंत्रज्ञानावरच आधारित आहेत.प्रश्न : एआयची निकड भविष्यात का वाढेल, असे तुम्हाला वाटते?संघवी: कोणत्याही क्षेत्रात सध्या कुशल मनुष्यबळ टिकवून ठेवणे ही सर्वाधिक मोठी समस्या आहे. त्यामुळे अशा कुशल मनुष्यबळ लागणाºया जागांवर भविष्यात एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज मशीन किंवा एआय तंत्रज्ञानाने परिपूर्ण रोबोटच ते काम करतील. ही मशीन्स अधिकाधिक काळ आणि अधिकाधिक अचूक काम करू शकणार असल्याने एआय तंत्रज्ञानावर आधारित मशीन्स हीच भविष्यात अशी अतिमहत्त्वाची कामे करताना दिसू शकणार आहेत.प्रश्न: कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीपेक्षाही हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक आहे, असे तुम्हाला वाटते का? त्याचे भवितव्य कसे आहे?संघवी: कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी केल्यानंतर सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या शाखांकडेदेखील कल आहे. मात्र, एआय हे त्यापेक्षाही अधिक आव्हानात्मक असून, त्याचे भान आजच्या युवा पिढीला झाले आहे. त्यामुळेच त्यांचा कल एआयकडे वाढत असून, कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंग केलेले इंजिनिअर्सदेखील एआयच्या आधुनिक शाखेकडे त्यांचा मोर्चा वळवत आहेत. काही मोठमोठ्या खासगी आस्थापनांनी तर त्याचे आॅनलाइन प्रशिक्षणदेखील उपलब्ध करून दिले आहे. मात्र, त्यात आॅनलाइनपेक्षा प्रत्यक्ष प्रशिक्षण हाच अधिक चांगला पर्याय ठरू शकतो, असे मला वाटते.मुलाखत- धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सEducationशिक्षण