प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाविष्कार

By Admin | Updated: January 28, 2017 00:40 IST2017-01-28T00:40:20+5:302017-01-28T00:40:32+5:30

लासलगाव : दत्ताजी पाटील, जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले मल्लखांबची प्रात्यक्षिके

Art dissemination on Republic Day | प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाविष्कार

प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाविष्कार

लासलगाव : येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिजामाता कन्या विद्यालयात प्राचार्य वि.दा.व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध देशभक्तिपर गीते सादर केली. तसेच लेजीम नृत्य सादर केले. मल्लखांबाचे प्रात्यक्षिके करून दाखविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगाव शिक्षण सहायक
मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून
संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, सचिव संजय पाटील, संचालक शंतनू पाटील, पुष्पा दरेकर, सीताराम जगताप, डॉ. सुरेश दरेकर, मनोहर वाघ, प्रकाश गांगुर्डे, किशोर क्षीरसागर यांच्यासह राजाराम सानप, तुळशीराम जाधव, साहेबराव वाजे, दिलीप पानगव्हाणे, हारुण शेख, शेखर देसाई, उमेश पारिक, नीलेश देसाई, राकेश बोरा, समीर पठाण, असीफ पठाण, सुनील पोळ आदि उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Art dissemination on Republic Day