शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

विघ्नहर्त्या गणरायाचे जलाभिषेकात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:55 IST

ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे.

ठळक मुद्देगणपत्ती बाप्पा मोरया। चैतन्याचा उत्सव; उदंड उत्साहात घरोघर 'श्री' विराजमान

नाशिक : ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे.गेल्याकाही दिवसांपासुन काहीशा निराशाजनक वातावरणात अचानक चैतन्य निर्माण झालेआणि घरोघर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अर्थातच, सुखकर्ता दुखहर्तासर्वांचीच संकटातून सुटका करेल या विश्वासातून! कोरोनाचे महासंकट आणि अन्य अनेक अडचणींवर मात करीत गणेशभक्तांनी याचैतन्याच्या उत्सवाचे स्वागत केले आणि अवघे शहर वेगळ्या उर्जेने भारलेगेले.उत्सवावर नियमांच्या मर्यादा असल्या तरी उत्सावर नाही, याचीप्रचिती देणारे शहरातील वातावरण दिसून येत होते. दरवर्षी गणपती बाप्पाच्या स्वागताला आतुर असणा-या गणेशभक्तांनी यंदाहीमोठ्या उत्साहानेच शनिवारी (दि. २२) श्रींच्या स्वागतासाठी पायघड्याघातल्या.  विविध रंगाच्या आणि काही कमलपुष्पावर तर काही सिंहासनारूढ गणेशमूर्तींनी यंदाही बाजारपेठ सजली होती. मुकूटापासून पगडी आणि फेटा परीधानकेलेले ऐटदार बाप्पा, कुठे राक्षसाचा वध करणारे तर कुठे कालीयामर्दनकरणारे महागणपती अशा साऱ्याच रूपांमधून लाडके रूप निवडण्यासाठी सकाळपासूनचगणेश मूर्तींच्या स्टॉलमध्ये गर्दी सुरू झाली होती.व्दारका, नाशिकशहराचा  मध्य भाग,नाशिकरोड, डोंगरे मैदान तसेच सिडकोतील मैदाने अशाठिकठिकाणी असलेल्या स्टॉलमधून गणरायाच्या मूर्ती घेण्यासाठी भरपावसातभक्त जमत होते. यंदा मूर्तीच्या उंचीवर मर्यादा असल्याने फार मोठ्यामूर्ती उपलब्ध नसल्या तरी मंडपाच्या आकाराच्या हिशेबाने सार्वजनिकमंडळांच्या मूर्ती प्रतिष्ठापीत झाल्या.भरपावसातही गणेश मंडळांचा उत्साह प्रचंड जाणवत होता. नागरिक मूर्ती खरेदीसाठी पावसातच येत होते. डोंगरे मैदानावर तर प्रचंड चिखल झाला होता. मात्र, चिखल तुडवत गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिक येत होते. ढोलताशा वाजत नाही तोपर्यंत गणेशोत्सवाला रंगचढत नाही. यंदा आगमन मिरवणुका नसल्यातरी भक्तीचा रंग अधिक होता. घंटा आणि थाळींच्या निनादात गणरायाचे स्वागत करण्यात आले. कोणत्याही मंडळाने मिरवणुका काढल्या नसल्यातरी ठिकठिकाणी पोलीस तैनात होते काही ठिकाणी त्यांनी गर्दी हटविण्याचेही काम केले.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव