चांदवड : शहीद किसान अस्थिकलश यात्रेचे रविवारी चांदवड येथे आगमन होताच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी अस्थिकलशाला पुष्पहार वाहून अभिवादन केले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ शहीद किसान अस्थिकलश यात्रा आयोजित करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र संघर्ष यात्रेचे उद्घाटन हुतात्मा स्मारक नाशिक येथे होऊन ही यात्रा रविवारी (दि. ७) चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास आली. त्याप्रसंगी चांदवड किसान संघर्ष समिती व भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा चांदवड तालुका यांनी घोषणा देऊन स्वागत केले.यावेळी कोतवाल राजू देसले, ॲड. दत्तात्रय गांगुर्डे, सुखदेव केदारे, भास्करराव शिंदे, गणपत गुंजाळ, शब्बीर सैय्यद तसेच विविध मान्यवरांची भाषणे झाली. तर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, उत्तम ठोंबरे, शिवाजी कासव व कम्युनिस्ट व किसान सभेचे नेते उपस्थित होते.(०७ चांदवड १)चांदवड येथे शहीद किसान अस्थिकलश यात्रेच्या स्वागतप्रसंगी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, ॲड. दत्तात्रय गांगुर्डे, संजय जाधव, शिवाजी कासव, उत्तम ठोंबरे, सुकदेव केदारे, भास्करराव शिंदे व नेते.
शहीद किसान अस्थिकलश यात्रेचे चांदवड येथे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 00:16 IST
चांदवड : शहीद किसान अस्थिकलश यात्रेचे रविवारी चांदवड येथे आगमन होताच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी अस्थिकलशाला पुष्पहार वाहून अभिवादन केले.
शहीद किसान अस्थिकलश यात्रेचे चांदवड येथे आगमन
ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ शहीद किसान अस्थिकलश यात्रा