कोकणगावी कृषीदूतांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:28 IST2019-06-21T18:27:59+5:302019-06-21T18:28:25+5:30
कोकणगाव : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे कृेीदूतांचे आगमन झाले असून ते प्रत्यक्ष शेतशिवाराला भेट देऊन पीकपद्धतीविषयीची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहेत.

कोकणगावी कृषीदूतांचे आगमन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक येथील चतुर्थ वर्षातील सात कृषिदूतांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र मांतर्गत आगमन झाले. यामध्ये प्रामुख्याने सरपंच आंबादास गांगुर्डे, उपसरपंच भारत मोरे ,ग्रामविकास अधिकारी अभिजित तुपे तसेच ग्रामस्थ व शेतकरी यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्र मास चेअरमन डॉ. कोळसे , प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण , प्रा. एस. यु. सूर्यवंशी ,कार्यक्र म अधिकारी प्रा. एस. एस.आहिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कृषिदूतांमध्ये आदिनाथ आल्हाट, गणेश भिताडे, अक्षय देशमुख, सोपान गांगुर्डे, विवेक भदाणे, ललित चव्हाण, शुभम भंडारे आदींचा समावेश आहे.