नाशिक : ‘हॅपी न्यू ईअर ऽ ऽ ऽ, हॅपी ट्वेन्टी-२०, हॅपी हॅपी हॅपी २०२० हॅपी’ यांसह अनकोनेक प्रकारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आणि मौज करीत करीत एकमेकांना आलिंगन देत नाशिककरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले. मध्यरात्री बाराच्या पाच-दहा मिनिटे आधीपासूनच उत्साही युवकांनी महानगरासह परिसरात अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचा आनंद साजरा केला. नववर्ष स्वागताच्या जल्लोषात तरु णाईचा उत्साह अधिक होता, तो वायनरी, नामवंत हॉटेल्स आणि ढाब्यांवरून ओसंडून वाहत होता. नवीन वर्ष हे २०-२० असल्याने यंदाच्या वर्षात सारे काही झटपट होण्याच्या शुभेच्छांच्या वर्षावात अवघी तरुणाई बेधुंद झाली होती. अनेकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून नवीन उपक्र मांनाही सुरु वात करण्याचे संकल्प सोडले.समाज माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षावहॅपी न्यू ईअरच्या पारंपरिक संदेशासह गतवर्षाला निरोप देत, नववर्षाच्या शुभेच्छा देणारे फोटो, व्हिडीओ किंवा आॅडिओ क्लिपच्या माध्यमातून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश मंगळवारी सकाळपासूनच मोबाइलवर आदळत होते. याशिवाय अन्य माध्यमांपैकी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या मीडियावरही नववर्षाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता. अनेकांनी त्यांच्या मोबाइलवरील ‘स्टेटस’देखील नववर्षाला साजेसे किंवा नववर्षाच्या शुभेच्छा असे ठेवले होते.
जल्लोष ट्वेन्टी-२०च्या आगमनाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:35 IST
हॅपी न्यू ईअर ऽ ऽ ऽ, हॅपी ट्वेन्टी-२०, हॅपी हॅपी हॅपी २०२० हॅपी’ यांसह अनकोनेक प्रकारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आणि मौज करीत करीत एकमेकांना आलिंगन देत नाशिककरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले.
जल्लोष ट्वेन्टी-२०च्या आगमनाचा!
ठळक मुद्देगुडबाय : सरत्या वर्षाला निरोप; नववर्षाच्या स्वागताला उधाण