धान्याची आवक टिकून क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:24+5:302021-05-05T04:24:24+5:30
कोट- मागील १५ दिवसांपासून लासलगावी धान्य लिलाव बंद होते. दोन दिवसांपासून कामकाज सुरू झाले असून आवक मध्यम स्वरूपाची आहे. ...

धान्याची आवक टिकून क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत दर वाढले
कोट-
मागील १५ दिवसांपासून लासलगावी धान्य लिलाव बंद होते. दोन दिवसांपासून कामकाज सुरू झाले असून आवक मध्यम स्वरूपाची आहे. सोयाबीन, मका, ज्वारी, चणा यांचे दर वाढले असून गहू, बाजरीचे दर स्थिर आहेत.
- ज्ञानेश्वर गांगुर्डे, धान्य व्यापारी
कोट -
कोरोनामुळे काही ठिकाणी बंद, काही ठिकाणी शॉर्टेज, लॉकडाऊन आदी कारणांमुळे धान्याचे भाव थोड्याफार प्रमाणात वाढले आहेत. बाजार समितीत आवक कमीही नाही आणि खूपच अधिकही नसली तरी धान्यांच्या दरामध्ये १०० ते १२५ फरक पडला आहे. - अभय ब्रह्मेचा, धान्य व्यापारी
कोट-
बऱ्याच दिवसांपासून धान्य विक्री करायची होती, पण बाजार बंद होते. आता धान्याला थोडाफार भाव मिळाल्याने किमान पुढच्या पेरणीसाठी भांडवल तरी मोकळे झाले आहे. - अशोक रौंदळ, शेतकरी
कोट -
गहू उत्पादनाचा खर्च वाढला आहे. मात्र त्या तुलनेत भाव खूप मिळतो असे नाही. जो काही मिळतो आहे त्यातून भांडवल उभे राहिले आहे. दोन पैसे हाती राहतील, अशी अपेक्षा आहे. - दिनकर पगारे, शेतकरी