नाशिक : धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाºया एकाला अंबड पोलिसांनी सिडकोतील सावतानगर भागातून अटक केली आहे.पवन विनायक वायाळ (वय २१ रा. सावतानगर), असे त्याचे नाव असून, गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता सावतानगरच्या गोकुळ दूध डेअरीसमोर असलेल्या धनलक्ष्मी चौकातून जाताना धारदार तलवार जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली. याबाबतची माहिती अंबड पोलिसांना समजताच त्यांनी संशयिताला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:25 IST