शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील सराईत घरफोड्यांच्या टोळीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 19:16 IST

आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़ या टोळीकडून घरफोडी व चोरीतील ८३ मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़

नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यातील घरफोडीचे गुन्हे वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घरफोडीच्या उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते़

निरीक्षक करपे यांनी माहिती घेतली असता काही संशयित दिंडोरी तालुक्यात राहत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव शिवारात मंगळवारी (दि़३१) रात्री सापळा रचून संशयित हरिदास बाळू निसाळ (२७), गणेश बाळू निसाळ (१९), कार्तिक नाना भोये (२०), राजू सुदाम निसाळ (२०, सर्व राहणार नाळेगाव ता. दिंडोरी) या चौघांना अटक केली तर श्रावण रामदास वाघमारे (२५) हा फरार आहे़

या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठ, दिंडोरी, गिरणारे परिसरात घरफोड्या तसेच नाशिक शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ या संशयितांकडून विविध कंपन्यांचे ८३ मोबाईल फोन, मोबाईल अ‍ॅक्सेसरी, होम थिएटर, रेडिमेड कपडे, डीव्हीआर मशीन, चोरी केलेली पल्सर दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली डिस्कव्हर दुचाकी तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेले स्क्रू ड्राइवर, पक्कड, लोखंडी कटवनी असा एकूण दोन लाख ७१ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मुंढे, रविंद्र शिलावट, पोलीस हवालदार प्रकाश् तुपलोंढे, हनुमंत महाले, दीपक अहिरे, पुंडलीक राऊत, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पोलीस नाईक वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, महिला पोलीस नाईक योगिनी नाईकयांनी ही कामगिरी केली़

बलात्कारातील शिक्षा भोगलेला टोळीचा म्होरक्याघरफोडी करणाऱ्या या टोळीचा म्होरक्या हरीदास बाळू निसाळ याच्यावर दिंडोरी तालुक्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता़ या गुन्ह्यात न्यायालयाने दिलेली सात वर्षांची शिक्षा भागून तो बाहेर आला आहे़ या आरोपींकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़

टॅग्स :NashikनाशिकArrestअटक