गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक
By Admin | Updated: November 29, 2015 23:12 IST2015-11-29T23:11:33+5:302015-11-29T23:12:25+5:30
गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक

गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक
लासलगाव : गावठी बनावटीची पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीच्या आधारे दोघांना नाशिक ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गोपिनियारीत्य कौशल्य पणाला लावून पिस्टल व जिवंत ८ काडतूसह १९ हजार रु पये किमतीचे मुदेमाल ताब्यात घेतले. निफाड येथील न्यायालयात हजर केले असतात पुढील तपासकामी तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
पोलीस अधिक्षक संजय मोहिते ,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले यांच्या पथकाने दिंडोरी व वणी येथे पेट्रोल पंपावरील दरोड्याचे तपास लावत आरोपी विजय गणपत जाधव रा.श्रीरामपूर याला अटक केली असतात त्याने दोन वर्षांपूर्वी अविनाश खंडागळे रा.नेवासा याच्या मार्फत गावठी बनावटीची पिस्टल विक्री केल्याचे तपासत निष्पन झाले होते. याप्रकरणी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेने गोपिनीयरित्या सापळा लावत शनिवारी लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचोरे खुर्द चे माजी तंटामुक्त समतिीचे अध्यक्ष गोपीनाथ धोंडीराम उगलमुगले यांच्या घराची झडती घेतली असतात गावठी बनावटीची पिस्टल व जिवंत 8 काडतूसे जप्त केले. ( वार्ताहर)