दंगलीत वृद्धाची हत्या करणा-या आरोपीस अटक
By Admin | Updated: February 24, 2017 02:39 IST2017-02-24T02:39:57+5:302017-02-24T02:39:57+5:30
पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपीला अकोट शहर पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी अटक केली.

दंगलीत वृद्धाची हत्या करणा-या आरोपीस अटक
नाशिक : गेल्या दीड दशकापासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला जिल्हा परिषदेतून अखेर पायउतार व्हावे लागले आहे. सर्वांत मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने मुसंडी मारत २५ जागा मिळवल्याने भाजपाबरोबर युती केल्यास सेनेला सत्ता स्थापन करता येणार आहे. भाजपास पंधरा जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी १९ जागा मिळून दुसऱ्या स्थानी असून, कॉँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले. मनसेचा धुवा उडाला असून, माकपाला तीन जागा लाभल्या आहेत.
शिवसेनेचे सर्वात धक्कादायक निकाल मालेगाव, नाशिक व निफाड तालुक्यांत लागले आहेत. मालेगाव येथून सातपैकी झोडगे, वडनेर खाकुर्डी या अवघ्या दोन गटांतून शिवसेनेला यश मिळाले असून, निमगाव, कळवाडी, सौंदाणे, दाभाडी व रावळगाव गटात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. निफाड तालुक्यातील दहा गटांपैकी पाच गटांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने विजय मिळविला. शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांना हा धक्का मानला जात आहे. चांदोरी, देवगाव, पालखेड, सायखेडा, विंचूर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसने, तर उगाव, पिंपळगाव व कसबे सुकेणे गटात शिवसेनेने विजय मिळवला. सिन्नर तालुक्यातील सहापैकी पाच जागांवर शिवसेनेने मुसंडी मारत नगरपालिका निवडणुकीची परंपरा कायम राखली. देवपूर हा एकमेव भाजपाचा गट वगळता चास, नायगाव, ठाणगाव, मुसळगाव व नांदुरशिंगोटे गटातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, शिरसाटे, खेड गटातून शिवसेनेच उमेदवार निवडून आले. नाशिक तालुक्यात शिवसेनेची जबरदस्त पीछेहाट होत पळसे, गोवर्धन, गिरणारे गट राष्ट्रवादीच्या ताब्यात तर एकलहरे गटातून सेनेचे बंडखोर शंकर धनवटे अपक्ष म्हणून निवडून आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरीतून कॉँग्रेस, ठाणापाडातून माकपा, तर हरसूल गटातून अपक्ष उमेदवार निवडून आले.
सुरगाणा तालुक्यातून भवाडा व गोेंदुणे गटातून माकपा, तर हट्टी गटातून भाजपाचे उमेदवार निवडून आले. कळवण तालुक्यातील कनाशी, मानूर व खर्डेदिगर गटातून राष्ट्रवादी तर अभोणा गटातून कॉँग्रेसने जागा जिंकली. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, कसबेवणी, मोहाडी, खेडगाव येथून शिवसेना, तर उमराळे व कोचरगाव गटातून कॉँग्रेसने विजय मिळविला. देवळा तालुक्यातून लोहणेर येथून भाजपा, तर उमराणे व वाखारी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. बागलाण तालुक्यातून नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव गटातून भाजपा, तर जायखेडा गटातून राष्ट्रवादी व ताहाराबाद गटातून अनुक्रमे राष्ट्रवादी व कॉँग्रेसने जागा जिंकली. पठावे दिघर गटातून अपक्ष आदिवासी क्रांतिसेनेने जागा जिंकली. (प्रतिनिधी)