दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक
By Admin | Updated: October 3, 2014 01:33 IST2014-10-03T01:33:27+5:302014-10-03T01:33:54+5:30
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक
नाशिक : तक्रार दाखल असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याच्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोदकुमार साहेबराव भालेराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली़
आज दुपारी भालेराव यांच्या घराजवळ गोविंदनगर येथील गोकुळधाम अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात महिनाभरापूर्वी तक्रारदाराविरुद्ध तक्रार अर्ज दाखल झाला होता़ याचा तपास भालेराव यांच्याकडे होता़ सदर अर्जावरून गुन्हा दाखल न करणे तसेच कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी भालेराव यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती़ याची माहिती सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती़ त्यानुसार सापळा रचून आज भालेराव यांना पकडण्यात आले़ (प्रतिनिधी)