फरार संशयित बरू पंचवटी पोलीसांना शरण
By Admin | Updated: May 23, 2014 00:39 IST2014-05-23T00:27:33+5:302014-05-23T00:39:49+5:30
हांडे खूनप्रकरण : सहा संशयित अटक

फरार संशयित बरू पंचवटी पोलीसांना शरण
हांडे खूनप्रकरण : सहा संशयित अटक
पंचवटी : मखमलाबाद नाक्यावरील कोठारवाडी परिसरात राहणार्या प्रविण उर्फ समीर हांडे या युवकाच्या हत्येप्रकरणात तीन महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी किशोर बरू हा दुपारी पंचवटी पोलीसांना शरण आला आहे.
या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत सर्वच्या सर्व सहा संशयितांना अटक केली आहे. तीन महिन्यांपुर्वी पुर्व वैमनस्यातून संशयित आरोपी तुकाराम चोथवे, निलेश नेरूकर, अमोल चांगले, प्रविण कुमावत, पप्पू खैैरे व किशोर बरू अशा सहा जणांनी हांडे याची तोंडावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलीसांनी काही संशयितांना लागलीच ताब्यात घेतले होते तर काही फरार झाले होते. याच प्रकरणात किशोर बरू हा देखिल फरार होता तर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुरूवारी दुपारी सव्वा वाजता बरू हा थेट पंचवटी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असुन पंधरवाडयापुर्वी घडलेल्या भिम पगारे हत्याकांडातही बरू याचा सहभाग असल्याने सुरूवातीला पंचवटीतील हांडे खून प्रकरण व त्यानंतर पगारे हत्याकांड आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडयाचा प्रयत्न या गुन्हयात वर्ग केले जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
या प्रकरणात पोलीसांनी संशयित आरोपींनी वापरलेले पिस्तुल काही दिवसांपुर्वी जप्त केले होते. आता पोलीसांनी सर्वच्या सर्व संशयितांना अटक केली आहे. दुपारी पंचवटी पोलीसांना हजर झालेल्या बरू याची तासभर चौकशी करण्यात आल्याचे समजते. (वार्ताहर)