विक्रीसाठी दारूसाठा बाळगणाऱ्यास अटक
By Admin | Updated: July 12, 2017 22:46 IST2017-07-12T22:45:53+5:302017-07-12T22:46:33+5:30
विक्रीसाठी दारूसाठा बाळगणाऱ्यास अटक

विक्रीसाठी दारूसाठा बाळगणाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : जुना मुंबई-आग्रा महामार्गावर विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरीत्या दारूचा साठा बाळगल्या प्रकरणी सागर सुरेश पगार (२५), रा. शिवशाही कॉलनी याच्याविरुद्ध छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली छावणीचे पोलीस निरीक्षक विश्वकर्मा यांनी ही कारवाई केली.
मंगळवारी जुना मुंबई-आग्रा महामार्गावर प्रथम बिअरबारसमोर पवननगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत लाकडी फळ्यांच्या टपरीत सागर सुरेश पगार हा बेकायदेशीररीत्या दारूसाठा बाळगताना मिळून आला. त्यास अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून २५ हजार ९०० रुपये किमतीचे १६ बॉक्स यात १२ सीलबंद बिअरच्या बाटल्या, १३ हजार १०४ रुपये किमतीच्या किंगफिशर बिअरची सात खोकी अशा एकूण २४ सीलबंद बिअरच्या बाटल्या असा एकूण ३९ हजार ३४ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक जगताप करीत आहेत.