हवेत गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाला अटक

By Admin | Updated: July 25, 2016 23:07 IST2016-07-25T22:53:02+5:302016-07-25T23:07:55+5:30

हवेत गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाला अटक

The arrest of a businessman who fired in the air | हवेत गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाला अटक

हवेत गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाला अटक

घोटी : दहशत पसरविण्याचा प्रयत्न; हॉटेलमालकाची पोलिसात तक्रारघोटी : घोटी-सिन्नर रस्त्यावर पिंपळगाव मोरनजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाने दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. याबाबत हॉटेलचालकाने तत्काळ घोटी पोलिसांना कळविल्यानंतर घोटी पोलिसांनी या व्यावसायिकाला वाहनासह ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी रात्रीसाडे ८ वाजेच्या सुमारास घोटी सिन्नर रस्त्यावर पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात असलेल्या ओम साई या हॉटेलात नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक तुषार पाटील आपल्या इतर सहकारी मित्रांसह (एमएच १५ ईपी ४५४५) या टाटा सफारी वाहनातून आले होते. त्यानंतर तुषार पाटील यांनी दहशत पसरविण्याचा उद्देशाने हॉटेलच्या मागील प्रांगणात जाऊन आपल्याजवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. (वार्ताहर)

Web Title: The arrest of a businessman who fired in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.