शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

८७ गुन्हेगारांची धरपकड; पोलिसांचे 'कोम्बिंग' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:41 IST

रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, तडीपार गुंडांची तपासणी यावेळी करण्यात आली. तसेच परिसरातील हॉटेल, लॉजदेखील पोलिसांनी पिंजून काढले.

ठळक मुद्दे८२ हॉटेल्स-ढाब्यांची तपासणीपोलिसांनी १०२ पैकी ८७ गुन्हेगारांवर कारवाई केली

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारही निश्चित झाले आहे. यामुळे शहरात गुन्हेगारीच्या घटना घडू नये व कायदासुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये सोमवारी मध्यरात्री शहरात आॅल आउटसह कॉम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी ८७ सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. नाकाबंदीपासून सर्वचप्रकारे पोलीस शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नांगरे-पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवारी (दि.७) रात्री १० वाजेपासून शहर-परिसरात आॅलआउट व कॉम्बिंग आॅपरेशन मोहीम राबविली गेली. पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या या महामोहिमेत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यादरम्यान पोलीस ठाणेनिहाय यादीवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी १०२ पैकी ८७ गुन्हेगारांवर कारवाई केली.नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळगाव, अंबड टी-पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापूनगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी, मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला. रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, तडीपार गुंडांची तपासणी यावेळी करण्यात आली. तसेच परिसरातील हॉटेल, लॉजदेखील पोलिसांनी पिंजून काढले.८२ हॉटेल्स-ढाब्यांची तपासणीआॅलआउट, कॉम्बिंग आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी शहरातील ८२ हॉटेल्स, ढाबे तपासले त्यापैकी आक्षेपार्ह आढळून आलेल्या २८ विक्रेत्यांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. नाकाबंदीमध्ये ३४० वाहने पहाटेपर्यंत पोलिसांकडून तपासली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. संशयास्पद ५१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी १० हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच शहर व परिसरातील ९६ टवाळखोरांवरही पोलिसांनी दंडुका चालविला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी