शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चहूबाजूंनी डोंगर असलेल्या धुळवडला खणाणला ‘मोबाइल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:14 IST

चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने धुळवडकरांना नववर्षाची ही दिलेली भेटच म्हणावी लागेल.

ठळक मुद्देनववर्षाची भेट : ‘गाव तेथे दूरध्वनी सेवा’ उपक्रम

नांदूरशिंगोटे : चहूबाजूंनी डोंगर असल्याने ज्या गावात वर्षानुवर्षे मोबाइलची रिंग खणाणलीच नाही अशा दुर्गम भागात वसलेल्या धुळवड गावात भारत संचार निगमने मनोरा उभारून दूरध्वनी सेवा सुरू केल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धुळवड येथे मोबाइल खणाणला आहे. भारत संचार निगमने धुळवडकरांना नववर्षाची ही दिलेली भेटच म्हणावी लागेल.ट्राय आणि दूरसंचार विभागाच्या ‘गाव तेथे दूरध्वनी सेवा’ या धोरणातून चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या तालुक्यतील धुळवड गावात दूरसंचारकडून सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे गावात जलद गतीने इंटरनेट सेवा मिळू लागली आहे. सिन्नरपासून अवघ्या २७ किलोमीटरवर धुळवड हे गाव आहे. छोटेसे वसलेले खेडे, चारही बाजूंनी डोंगर टेकड्या. आजूबाजूच्या वस्त्यापाडे धरून अंदाजे दीड हजार लोकवस्तीचे हे गाव दूरसंचार सेवेपासून वंचित होते.दूरसंचार विभागाने गावात मनोरा लावला त्यानंतर हे गाव जगाच्या संपर्कात आले. धुळवड या छोट्याशा गावात कोणत्याही कंपनीची दूरसंचार सेवा नसल्याने तेथील नागरिकांना छोटछोट्या कामासाठी तालुक्याला जावे लागत होते. पण आता गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना फायदा होणार आहे.खासदार हेमंत गोडसे यांनी दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत दूरसंचार कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्याकडे दूरसंचार मनोरा उभारण्यासाठी आग्रह धरला होता. महाजन यांनी या विषयाचा पाठपुरावा करीत ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनोरा उभारण्यातआला.गावच्या यात्रेचे औचित्य साधत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, दूरसंचार कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्या उपस्थितीत या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी दूरसंचार सल्लागार समिती सदस्य निवृत्ती डावरे, जनसंपर्क अधिकारी जी. जी. बोरसे, सरपंच मंदा आव्हाड, उपसरपंच प्रकाश आव्हाड, गणपत सांगळे, इंदूबाई आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, निवृत्ती आव्हाड, अशोक आव्हाड, मधुकर आव्हाड, बाळकृष्ण सांगळे, ग्रामसेवक एस. ए. पाटोळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMobileमोबाइल