शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

सेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 1:07 AM

शिवसेना पंचवटी विभागाचे माजी उपविभागप्रमुख उमेश काशिनाथ नाईक (३७) यांनी शुक्रवारी (दि. ७) दुपारी नागचौक येथे असलेल्या जुन्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पंचवटी : शिवसेना पंचवटी विभागाचे माजी उपविभागप्रमुख उमेश काशिनाथ नाईक (३७) यांनी शुक्रवारी (दि. ७) दुपारी नागचौक येथे असलेल्या जुन्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाईक यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी आर्थिक प्रश्नांमुळे त्यांनी अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याची परिसरात चर्चा आहे.नागचौक येथील जुन्या घराला रंगकाम करायचे असल्याने तिकडे चाललो असल्याचे पत्नीला सांगून उमेश नाईक  शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिर परिसरात असलेल्या नव्या घरातून बाहेर पडले होते. मात्र दुपारनंतर ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन केला. त्यांनी फोनही उचलला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या जुन्या घराकडे धाव घेत दरवाजा वाजविला. परंतु, काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर घराचा दरवाजा तोडला असता नाईक यांनी घरात स्लॅबच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली. नाईक यांनी आत्महत्या का केली याचे कारण शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र आर्थिक वादातून नाईक यांनी अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचल्याची चर्चा आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी