शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

सेना-भाजपला बंडखोरीची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 01:03 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीटवाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांमध्ये भाजपच्या इच्छुकांबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षांमधील या बंडखोरीचा लाभ विरोधी पक्षांना झाला असून, नाराज झालेल्यांनी पक्षांतर करून ऐनवेळी उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे.

ठळक मुद्देस्वकीयांबरोबरच मित्रपक्षांचे आव्हान : विरोधी पक्षांचे फावले :पक्षांतर करत उमेदवारी पदरात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीटवाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांमध्ये भाजपच्या इच्छुकांबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षांमधील या बंडखोरीचा लाभ विरोधी पक्षांना झाला असून, नाराज झालेल्यांनी पक्षांतर करून ऐनवेळी उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे.नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत सेनेने दहा व भाजपने पाच जागा वाटून घेत अपवाद वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली असून, दोन्ही पक्षांनी आपल्या मागच्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, या अपेक्षेने गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात पक्षसंघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामे केलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघावर यंदा सेनेने दावा सांगून गेल्या काही महिन्यांपासून सेनेच्या नगरसेवकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात होती. परंतु जागा भाजपला व विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे सेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सिडकोतील सर्व सेनेच्या नगरसेवकांची बैठक बोलावून निवडणुकीत भाजपचा प्रचार न करण्याचे संकेत दिले आहेत.सेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी जागा भाजपला सुटणार असल्याचे गृहीत धरून दोन दिवसांपूर्वीच मनसेची वाट धरून उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे. मित्रपक्षांकडून भाजपसमोर अडचणी उभ्या केल्या जात असताना भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनीदेखील समर्थकांचा मेळावा घेऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देवळाली मतदारसंघ सेनेला सोडल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी चालेल, परंतु निवडणूक लढविण्याचा त्यांनी इरादा बोलून दाखविला आहे. इगतपुरी मतदारसंघातून कॉँग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनीही समर्थकांची जमवाजमव सुरू केलीआहे.नांदगाव मतदारसंघ सेनेला सुटल्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे, तर दिंडोरी मतदारसंघातून सेनेने माजी आमदार धनराज महाले यांना तिकीट दिल्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी अपक्ष लढविण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे, तर जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. कळवण मतदारसंघ सेनेला सुटल्याने भाजपचे इच्छुक एन. डी. गावित यांनी नाराजी बोलून दाखविली आहे. बुधवार ठरला ‘पक्षांतरा’चा वारसत्ताधारी पक्षातील इच्छुकांच्या बंडखोरी व नाराजीतून बुधवारी पक्षांतराने दिवस गाजला. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्टÑवादीत प्रवेश करून उमेदवारी खिशात घातली, तर मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्वचे भाजप आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट झाल्याचे पाहून भाजपचे दार ठोठावले आहे. विधानसभेचे नामांकन दाखल करण्यास अजून दोन दिवस शिल्लक असल्याने अखेरच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019