जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश
By Admin | Updated: March 12, 2017 01:23 IST2017-03-12T01:22:59+5:302017-03-12T01:23:12+5:30
नाशिक : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी दि. १५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश
नाशिक : जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दि. १५ रात्री १२ वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणुका काढण्यास संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींना लागू नाही.