पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

By Admin | Updated: February 11, 2017 00:33 IST2017-02-11T00:33:22+5:302017-02-11T00:33:39+5:30

कर्मचाऱ्यांना मारहाण : पिस्तुलाचा धाक देत सव्वादोन लाखांची रोकड लुटली

Armed robbery on petrol pump | पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

 पंचवटी : आडगाव शिवारातील लाखलगाव परिसरात असलेल्या गौरव पेट्रोलपंपावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहा दरोडेखोरांच्या टोळीने पंपावर काम करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून केबीनमधील तिजोरीत ठेवलेली दोन लाख बाबीस हजार रुपयांची रोकड जबरीने लुटून नेल्याची घटना घडली आहे. परिसरात पेट्रोलपंपावर पडलेल्या या दरोड्याच्या घटनेमुळे पुन्हा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत आडगाव पोलिसांत दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पेट्रोलपंपावर काम करणारा नाशिकरोड येथील कर्मचारी केतन श्रावण वऱ्हाडे यांनी आडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमाराला अमर संजय फुलावळे, आकाश नारायण अहेर व स्वत: तिघे ड्युटीसाठी होते. रात्री पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची वर्दळ नसल्याने तिघेजण पंप परिसरात झोपलेले असताना सहा दरोडेखोर त्याठिकाणी आले व त्यांनी काही कळायचा आतच तिघांनाही बेदम मारहाण सुरू करून कॅबिन कोठे आहे.
कॅबिनची चावी मागितली, मात्र कर्मचाऱ्यांनी नकार दिला असता त्यातील काही संशयितांनी हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून चावी न दिल्यास जिवे ठार करण्याची धमकी दिल्याने कर्मचाऱ्यांनी कॅबिनची चावी संशयितांना दिली. त्यानंतर काही संशयितांनी कॅबिनच्या दिशेने धाव घेत कॅबिन उघडून तिजोरीत ठेवलेले दोन लाख बावीस हजार रुपयांची रोकड लुटून नेली. (वार्ताहर)

Web Title: Armed robbery on petrol pump