सशस्र दरोडेखोरांचा धामणगावात धुमाकूळ

By Admin | Updated: July 23, 2014 00:35 IST2014-07-22T01:32:33+5:302014-07-23T00:35:10+5:30

सशस्र दरोडेखोरांचा धामणगावात धुमाकूळ

Armed robberies | सशस्र दरोडेखोरांचा धामणगावात धुमाकूळ

सशस्र दरोडेखोरांचा धामणगावात धुमाकूळ

 

येवला : धामणगाव परिसरातील दोन वस्त्यांवर सशस्र दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत दागिने व रोख रकमेसह चार लाखांचा ऐवज लुटला. सदरची घटना रविवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
धामणगाव येथे तुकाराम वाळुंज यांची वस्ती आहे. रविवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेले व सडपातळ बांधा असलेले २० ते २५ वयोगटातील दहा-बारा अज्ञात युवक हातात कोयते-कुऱ्हाडी घेऊन वाळुंज यांच्या घरात घुसले. त्यांनी तुकाराम वाळुंजे यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले, सुनांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका खोलीत कोंडले आणि घरातील दोन लाख ४३ हजार रुपयांच्या दागिन्यांसह ५० हजार रुपयांची रक्कम लुटली. यावेळी वाळुंज कुटुंबीयांनी दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले
होते.
याच दरोडेखोरांनी नंतर अंदरसूल रस्त्यावरील धनगे यांच्या वस्तीवर मोर्चा वळविला आणि कैलास धनगे यांच्या घरात घुसून ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने व ३० हजार रुपयांची रक्कम लुटली. यावेळी दरोडेखोरांनी कैलास धनगे यांना मारहाण केली.
सदर घटनेची माहिती मिळताच येवला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाने
धनगे वस्तीपासून अंदरसूलकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत माग
दाखविला.
ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय कडासने, मनमाड पोलीस उपअधीक्षक मेघराजानी यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली.
दरोडेखोरांच्या तपासासाठी वैजापूर, नगर, उंदीरवाडी परिसरात पोलिसांचे पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Armed robberies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.