नाशिक : कोरोनाचे संकट निवारण्यासाठी लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात रमजान पर्वातील ‘शब-ए-कद्र’ची रात्र बुधवारी (दि.२०) रात्री साजरी होत आहे. पुर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करत शीघ्र कृती दलाच्या सशस्त्र जवानांसह संचलन केले.येत्या २५ तारखेला रमजान ईदचा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन तसेच कलम-१४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने काही जिल्ह्यांत पाठविलेल्या शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांपैकी नाशिकमध्येही एक तुकडी दाखल झाली आहे. या तुकडीत एकूण १२५ जवान आहेत. त्यामध्ये डेप्युटी कमान्डंट, सहायक आयुक्त-२, पोलीस निरिक्षक-३, उपनिरिक्षक-४, महिला कर्मचारी-१० आणि उर्वरित जवानांचा फौजफाटा आहे.
शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:48 IST
भद्रकाली पोलीस ठाण्यापासून परस्परांमध्ये ‘अंतर’ राखत जवानांनी सशस्त्र संचलन सुरू केले. हातामध्ये अत्याधुनिक गन, लाठी तोंडावर फेस शिल्ड मास्क घातलेले निळ्या वर्दीतील जवान रस्त्यांवर उतरल्याचे पाहून नागरिकांची भंबेरी
शीघ्र कृती दलाचे जुन्या नाशकात सशस्त्र संचलन
ठळक मुद्देनागरिकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावेभद्रकाली पोलीस ठाण्यात बुधवारी धर्मगुरूंची बैठक