ब्राह्मणगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा बल व सटाणा पोलीस प्रशासनातर्फे शुक्र वारी (दि. ११) गावात पथसंचलन करण्यात आले. ब्राह्मणगाव संवेदनशील केंद्र असल्याने संचलन करण्यात आले. यावेळी सशस्त्र सीमा बल ७२ वाहिनी ७०३ (ई) कंपनी सिक्कीमचे एस. आय. सूरजकुमार, पी. आय. मृत्युंजयकुमार व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पुंडलिक डंबाळे, योगेश गुंजाळ, हेड कॉन्स्टेबल हेमंत कदम, शिसोदे, वाहतूक शाखेचे गायकवाड यांच्यासह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, पोलीसपाटील मालपाणी उपस्थित होते.
ब्राह्मणगावला सशस्त्र सीमा बलाचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:34 IST