नांदगाव पंचायत समिती उपसभापतिपदी अर्चना वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:11 IST2020-09-30T21:34:08+5:302020-10-01T01:11:11+5:30
नांदगाव : पंचायत समितीच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना हेमराज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुशीला नाईकवाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाल्यामुळे उपसभापती पदासाठी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली.

उपसभापतिपदी अर्चना वाघ यांची निवड झाल्यनंतर त्यांचे स्वागत करताना नगराध्यक्ष राजेश कवडे, रमेश बोरसे, भाऊसाहेब हिरे, तेज कवडे, विलास आहेर, किरण देवरे, प्रमोद भाबड आदी.
नांदगाव : पंचायत समितीच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना हेमराज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुशीला नाईकवाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाल्यामुळे उपसभापती पदासाठी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसभापती पदासाठी अर्चना वाघ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, नगराध्यक्ष राजेश कवडे, सभापती भाऊसाहेब हिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तेज कवडे, माजी सभापती विलास आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे, सुमन निकम, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड आदी उपस्थित होते.